नवी दिल्ली । अलीकडे अनेक देशांनी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला. पण, यावर जागतिक आरोग्य संघटनेने आवाहन लॉकडाऊन पूर्णपणे हटवू नका असे आवाहन केले आहे. डब्ल्यूएचओेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम गेब्रेयेसस यांनी एका व्हर्च्युअल कॉन्फरन्सला त्यांनी संबोधित करताना हा इशारा दिला आहे.
ट्रेडोस म्हणाले, जगभरातील विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये, कामकरी वर्गाला आपल्या कार्यालयांमध्ये पुन्हा जाताना पाहायचे आहे. परंतु, ही महामारी पूर्णपणे संपली आहे, अशाप्रकारे कोणत्याही देशाने वागू नये. जर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कोणता देश प्रयत्न करत असेल तर त्यांना प्रथम कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवायला हवे. तसेच लोकांचे प्राणही वाचवायला हवे. कोणत्याही नियंत्रणाशिवाय निर्बंध उठवणे म्हणजे विध्वंसाला आमंत्रण देण्यासारखे आहे.