जळगाव प्रतिनिधी । जळगावातील दुकाने खुलण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज नवीन आदेश जारी केले असून आपणासाठी ही ऑर्डर जशीच्या तशी सादर करत आहोत.
जिल्हाधिकार्यांनी आज खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत.
आदेश :-
जळगाव जिल्हयामध्ये कोव्हिड-१९ बाधित व्यकतीची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरीकांना वेळोवेळी सुचना, निर्देश, आदेश निर्गमित करुनही नागरीक / व्यक्तो मोठया प्रमाणावर अनावश्यक्कारित्या सार्वजनिक ठिकाणी गर्दौ करीत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे कोव्हिड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यास अडचणी निर्माण होत असल्याने मार्केट परिसरात नागरीकांची होणारी अनावश्यक गर्दी कमी करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी, मी अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अन्वर्य मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगाव महानगरपालिका क्षेत्राकरीता पुढील आदेश होईपावेतो खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अ) २० पेक्षा अधिक दुकाने एकत्र असणार्या मार्केट क्षेत्र / परिसराकरीता-
१) जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील ज्या मार्केट परिसरात / क्षेत्रामध्ये २० पेक्षा जास्त दुकाने (शॉप्स) एकत्रित असतीन अशा दुकन मालकांना / चालकांना केवळ दुपारी १२ ते ४ वा वेळेतच मालाची घरपोच विक्री (होम डिलीव्हरी) करता येईल.
२) वरील प्रमाणे मालाची घरपोच विक्री ( होम डिलीव्हरी ) करतांना दुकानात केवळ दुकान चालक व त्यांचे दोन प्रतिनिधी यांनाच प्रवेश असेल व त्यांनी ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य असेल.
३) घरपोच मालाची विक्री ( होम डिलीव्हरी ) करतांना संबंधितांनी चेहर्यावर मास्क लावणे व सोबत सॅनिटायजर्स वाळगणे अनिवार्य असेल. तसेच घरपोच मालाची विक्री करीत असलांना किमान ग्राहकांपासून सहा फुट अंतर ठेवणे आवश्यक राहील.
व) २० पेक्षा कमी दुकाने एकत्र असणार्या मार्केट क्षेत्र / परिसराकरीता –
१) जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील ज्या मार्कट परिसरात / क्षेत्रामध्ये २० पेक्षा कमी दुकाने (शॉप्स) एकत्रित असतीन अशी दुकाने ग्राहकांना खरेदीसाठी सुरु राहतील. संबंधीत दुकान मालक / चालक यांना मालाची विक्री सकाळी (०९,.०० से सायं.०७.०० ऑन द काऊंटर अथवा होम डिलीव्हरी या प्रकारात करता येईल. सदर मार्केट परिसरातील दुकाने आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, यांनी यापूर्वी लागू केलेल्या सम-विषम दिनांकाच्या निकपांप्रमाणेच सुरु राहतील. सदर दुकानांच्या बाबतीत रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर उत्तर वाजूकडील दुकाने विषम दिनांकास आणि रस्ता दक्षिण-उत्तर असल्यास रस्त्यांच्या पूर्व बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर पश्चिम बाजुकडील दुकाने विषम दिनांकास उघडी राहतील अशा पच्दतीने सर्व दुकाने सुरु राहतील.
२) तथापि वर नमूद केलेली दुकाने, आस्थापना, शॉप्स यांनी मानाची विक्री करण्याचा जास्तीत जास्त भर हा घरपोच मालाची विक्री (होम डिलीव्हरी ) यावर द्यावा.
३) कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुम दुकानदारांना सुरु ठेवता येणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत एक्सचेंज अँड रिटर्न पॉलिसी ठेवता येणार नाही.
४) संबंधित दुकानांच्या ठिकाणी एकाच वेळी ०५ पेक्षा अधिक ग्राहक एकत्र येणार नाहीत. तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन केले जाईल, याची अंतीम जबाबदारी संबंधित दुकानाचे चालक मालक यांची राहील.
५) सर्व नागरोकांना दुकानात जात असतांना चेहर्यावर मास्कचा वापर करणे बंंधनकारक राहील. तसेच दुकानाच्या ठिकाणी सॅनिटायजर्स, हात धुण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित दुकानांचे चालक/ मालक यांची राहील.
६) जळगाव शहर महानगरपालिका जळगाव हद्दीतील गर्दीच्या ठिकांणाकरीता या कार्यालयाकडून निर्गमीत करण्यात आलेले आदेश दिनांक १३ जुलै, २०२० अन्वये लागू करण्यात आलेले ते नो व्हेईकल झोनबाबतचे निकष पूर्वी प्रमाणेच अबाधितपणे लागू राहतील.
वर नमूद परिच्छेद अ व ब मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करण्यात कसूर केल्यास संबंधित दुकान, आस्थापना, शॉप्स हे तात्काळ सिल केले जातील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम ।८८, आपना व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६५० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदरचा आदेश हा आज दिनांक १८/०७/२०२० रोजी माझ्या सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केले आहे.