जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात सक्रीय झाल्यानंतर आता लवकरच राज्यात नवीन सरकार येणार असल्याचे विधान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर भाजपतर्फे अतिशय सावध भूमिका घेण्यात आली आहे. भाजपच्या कोणत्याही महत्वाच्या नेत्यांनी नवीन सरकार स्थापन करण्याबाबत विधान केलेले नाही. शिंदे यांचे बंड हा शिवसेनेता अंतर्गत प्रश्न असल्याचे आजवर विविध नेत्यांनी सांगितले. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुप्त भेटीगाठी घेत असले तरी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. त्यांची एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची एकत्र भेट झाली असून यात सत्ता स्थापनेचे सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमिवर, आज जालन्यातील एका कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आम्ही फक्त दोन-तीन दिवसच विरोधी पक्षात राहणार असून आमचे राज्यात लवकरच सरकार येणार आहे. यामुळे सत्ताधार्यांनी दोन दिवसात पाहिजे तशी कामे करून घ्यावीत असा सल्ला देखील त्यांनी दिला.