Home Cities मुक्ताईनगर संत मुक्ताई पत्रकार संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर – अमोल वैद्य अध्यक्षपदी, तर...

संत मुक्ताई पत्रकार संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर – अमोल वैद्य अध्यक्षपदी, तर सचिवपदी राजेश पाटील

0
306


मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत मुक्ताई पत्रकार संघटना, मुक्ताईनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एकमताने नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेतील आतापर्यंतच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नव्या नेतृत्वाकडे पारदर्शकतेच्या आशेने सदस्यांनी आपला विश्वास दर्शविला आहे.

संघटनेच्या अलीकडील बैठकीत जुनी कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे उपस्थित सदस्यांनी संयुक्तरित्या अविश्वास ठराव मांडला, जो एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर नव्या नेतृत्वाच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आणि त्यातून एकसूत्री निर्णय घेण्यात आला.

अध्यक्षपदी अमोल वैद्य यांची सर्वानुमते निवड झाली असून, उपाध्यक्ष म्हणून मुकेश महल्ले, तर सचिवपदी राजेश पाटील यांची निवड झाली आहे. तसेच, कार्याध्यक्ष म्हणून एम. के. पाटील सर, कोषाध्यक्षपदी राजेश चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ सल्लागार म्हणून मोहन मेढे, संतोष मराठे आणि मतीन शेख यांचा समावेश करण्यात आला आहे.

संघटनेच्या संघटकपदासाठी दीपक चौधरी आणि रवींद्र धनगर यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून प्रवीण भोई, देवेंद्र काटे, छबीलास पाटील व निलेश मेढे हे कार्यरत राहतील. नव्याने गठित ही कार्यकारिणी पत्रकारांच्या हक्क, संरक्षण व सामाजिक उत्तरदायित्व जपत संघटनेचे कार्य पारदर्शक पद्धतीने पुढे नेईल, असा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

संघटनेतील या बदलामुळे आगामी काळात पत्रकारांसाठी सकारात्मक व प्रगल्भ दिशा ठरविली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कार्यकारिणीच्या नव्या नेतृत्वावर सर्व पत्रकार बांधवांचा विश्वास आहे व संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound