जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील पांजरपोळ चौक, जुने जळगाव परिसरातील तरुण कुढापा मंडळाची २०२५-२६ वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात चेतन गणेश चौधरी यांची अध्यक्षपदी, तर राहुल आतिश कोळी यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाचे यंदाचे ६२ वे वर्ष असून, यावर्षी केदारनाथ आरास देखावा सादर करण्यात येणार आहे.
मंडळाच्या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष दीपक मराठे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, तर मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार किसन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीत विविध महत्त्वाचे ठरावही मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुरळकर यांनी केले, तर राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मंडळाने मंजूर केलेले प्रमुख ठराव खालीलप्रमाणे:
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करणे. शहरातील नामांकित दहीहंडी फोडणे. हिंदू धर्मियांचे सर्व सण-उत्सव उत्साहात साजरे करणे. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे.
मंडळाची २०२५-२६ वर्षासाठीची कार्यकारिणी:
अध्यक्ष: चेतन चौधरी, उपाध्यक्ष: राहुल सोनवणे, कार्याध्यक्ष: शंभू भावसार, सेक्रेटरी: राजेंद्र पाटील, सह सेक्रेटरी: सुमित सपकाळे, खजिनदार: प्रतीक साळुंखे, सहखजिनदार: मिलिंद सपकाळे,
संचालक: भोजराज बारी, सहसंचालक: जयेश कोल्हे, संघटक: मोहित पाटील, सहसंघटक: धनराज सोनवणे, कायदेशीर सल्लागार: ॲड. मुकेश शिंपी, ॲड. आर. व्ही. पाटील, ॲड. ललित सरोदे, ॲड. ओम चौधरी. प्रमुख सल्लागार: पांडुरंग चौधरी, बापू मराठे, दिगंबर पाटील, छोटू लोहार, तातू मराठे, संजय चौधरी, प्रल्हाद पाटील, मुन्ना परदेशी, भैय्या ठाकूर, शैलेश सुरळकर, नारायण कोळी, सचिन चौधरी.
या कार्यकारिणीमध्ये हरीश चौधरी, गौरव चौधरी, कन्हैया चौधरी, दीपक मराठे, गणेश भावसार, रोशन पाटील, रोहन कोल्हे, निलेश कोळी, मयूर चव्हाण, गुड्डू भावसार, आशिष चौधरी, सचिन पवार यांचाही समावेश आहे. शांतता समितीमध्ये रवींद्र घुले, मयूर ठाकूर, ईश्वर सोनवणे, भूषण पाटील, निलेश माळी, प्रेम चौधरी, नितीन चौधरी, प्रफुल गुप्ता, सुमित बारी, गौरव चौधरी, आकाश बुनकर यांचा समावेश आहे. तसेच, राजेंद्र पाटील, शंभू भावसार, प्रल्हाद पाटील, संदीप भावसार, भूषण पाटील, पवन शिंपी हे लेझीम पथकाची धुरा सांभाळतील, तर दहीहंडी देखरेख समितीमध्ये राजेंद्र पाटील, अनिल ठाकूर, गणेश पाटील, प्रशांत सुरळकर, मुन्ना बारी, अनिल कोळी आणि कमलेश पाटील यांचा समावेश आहे.



