
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ परिसरात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत नेहमी आघाडीवर राहणाऱ्या ‘जय श्रीराम बहुद्देशीय मंडळ’ने आपल्या स्थापनेच्या २६ व्या वर्षात यंदा उत्साहाने पाऊल ठेवले आहे. या नव्या वर्षात मंडळाने आपल्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली असून, आगामी गणेशोत्सवासाठीही जय्यत तयारी सुरू केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ विविध सामाजिक कार्यांतून एक वेगळी ओळख निर्माण करत आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीस विशेष आकर्षण असणार आहे. या मिरवणुकीत महिलांच्या आणि पुरुषांच्या सहभागातून पारंपरिक लेझीम नृत्याचे सादरीकरण होणार असून, यासाठी सध्या तयारी मोठ्या जोमात सुरू आहे. पारंपरिक वेशभूषा आणि शिस्तबद्ध सादरीकरणासाठी मंडळातील सदस्य सातत्याने सराव करत आहेत.
नवीन कार्यकारिणीत निलेश पाटील अध्यक्षपद भूषवणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्षपदाची जबाबदारी कुणाल कांकरिया यांच्याकडे आहे. सचिव गणेश माळी, सहसचिव अक्षय जोशी, खजिनदार मयूर चौधरी आणि कार्याध्यक्ष विजय देवरे हे मंडळाच्या कामकाजात सक्रीय भूमिका बजावणार आहेत. अनुभवी मार्गदर्शक सल्लागार म्हणून दत्तात्रय जोशी, ताराचंद जोशी, लालचंद जोशी, चेतन वाणी, कृष्णा देवरे, विक्की चौधरी, शिवाजी चौधरी, गोपाल देवरे, आणि विवेक भट यांचा सल्ला मंडळाला लाभणार आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये राकेश जोशी, गौरव चौधरी, हर्षल चौधरी, गणेश चौधरी, मोहित प्रजापती, ललित चौधरी, पवन चौधरी, साहिल जोशी, निखिल जोशी, आणि गोलू बोरकर यांचा उपक्रमशील सहभाग नेहमीच राहिला आहे. हे सदस्य प्रत्येक उपक्रमात स्वतःहून पुढाकार घेत सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपतात.
मंडळाच्या वतीने दरवर्षी भजन संध्या, शालेय स्पर्धा, आरोग्य शिबिरे, आणि सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात. यावर्षीही सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. २६ वर्षांचा सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचाल अनुभवलेले हे मंडळ भविष्यातही समाजहितासाठी कार्यरत राहण्यास कटिबद्ध आहे.



