धरणगाव वकील संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुका वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत सन 2025-26 साठी संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते झाली असून, अध्यक्षपदी ॲड. महेंद्र भिला चौधरी, उपाध्यक्षपदी ॲड. संजय छगन महाजन, सचिवपदी ॲड. गणेश सुभाष मांडगे, तर सहसचिवपदी ॲड. प्रदीप सुकलाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

सभेला तालुक्यातील अनेक विधिज्ञ उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित ॲड. बी.के. आवारे, ॲड. सी.झेड. कट्यारे, ॲड. राहुल पारेख, ॲड. गजानन पाटील, ॲड. व्ही.एस. भोलाणे, ॲड. संदीप पाटील, ॲड. आर.एस. पाटील, ॲड. आर.एस. शिंदे, ॲड. डी.ए. माळी, ॲड. मनोज दवे, ॲड. कैलास मराठे, ॲड. आसिफ कादरी, ॲड. विक्रम परीहार, ॲड. कन्हैया रायपूरकर, ॲड. संदीप सुतारे, ॲड. जी.सी. कट्यारे, ॲड. एकनाथ पाटील, ॲड. हर्षल चव्हाण, ॲड. कुलदीप चंदेल, ॲड. प्रशांत क्षत्रिय, ॲड. रावसाहेब निकुंभ, ॲड. सागर महाजन, ॲड. सागर वाचपाई, ॲड. रविंद्र गजरे, ॲड. विवेक पाटील आदींनी अभिनंदन केले. यावेळी वकील संघाच्या भविष्यातील कार्ययोजनांवर चर्चा झाली. नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संघाच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Protected Content