अर्ध्या तासात मिळणार कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट !

मुंबई प्रतिनिधी | अवघ्या अर्ध्या तासामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला की नाही ? याचे निदान करणारी नवीन चाचणी विकसित करण्यात आली असून यामुळे कोविडच्या संसर्गाचे तात्काळ निदान होणार आहे.

या संदर्भात माहिती अशी की, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी कोरोनासाठी नवीन चाचणी विकसित केलेली आहे. या चाचणीमुळे फक्त ३० मिनिटांत टेस्टचा रिपोर्ट मिळणार असून तपासणीचा खर्चही कमी येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे या चाचणीत डोळ्यांची चाचणी करुन कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे सांगता येणार आहे.

या टेस्टला आरटी लँप असे नाव देण्यात आले आहे. या चाचणीसाठी महागडी यंत्रणा तसेच कुशल मनुष्यबळाचीही गरज नाही. ही मॉल्येक्युलर बेस्ड तंत्रावर आधारित आहे. या चाचणीमुळे देशातील एकूण कोरोना चाचण्याचा वेग मात्र वाढणार आहे. अर्थात वेळीच उपचार मिळाल्याने रूग्ण बरे होण्याचा वेग देखील वाढणार आहे.

Protected Content