मुक्ताईनगर मतदार संघातील गावांसाठी २१ तलाठ्यांची नव्याने नियुक्ती; आ.चंद्रकांत पाटील याचा पाठपूरावा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर या तालुक्यांमधील मतदारसंघातील गावात अतिरिक्त कार्यभार असलेले तलाठी असल्यामुळे गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी व इतर शासकीय कामांसाठी अडचणी येत होत्या. आता नव्याने तलाठी भरती झालेल्या तलाठ्यांमधील 21 तलाठी मुक्ताईनगर मतदारसंघातील गावांसाठी मिळालेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या रिक्त जागा भरण्या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटिल यांनी तगादा लावला होता. तसेच जिल्ह्यातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात सर्वच आमदार व जिल्हा प्रशासनाकडून राज्यस्तरावर मागणी होत होती. मागील काळात तलाठी भरतीच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परिक्षेत ऊत्तीर्ण झालेल्यांपैकी मुक्ताईनगर मतदारसंघातील गावांसाठी २१ तलाठी नव्याने मिळालेले आहे. २५ जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी पुर्वी जिल्ह्यातील सर्वच नवनिर्वाचित तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटिल, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटिल, आमदार चंद्रकांत पाटिल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्ह्यातील इतर आमदारांच्या ऊपस्थितीत नियुक्तीपत्र तलाठ्यांना देण्यात आले. यावेळी नियुक्ती पत्र मिळालेल्या २१ तलाठ्यांची मुक्ताईनगर मतदारसंघातील मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तहसिल कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content