मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आयआरसीटीसी कडून भारतामध्ये रेल्वेचा प्रवास सुकर करण्यासाठी नवं अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. हे आयआरसीटीसी सुपर अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढणं, त्यांचा पीएनआर चेक करणे त्यांचा रेल्वे प्रवास नीट मॅनेज करता येणार आहे. याच्या माध्यमातून अनेकांना देशात नीट प्रवास करता येणार आहे. प्ले स्टोरवरहे नवे अॅप ग्राहकांना विनाशुल्क डाऊनलोड साठी उपलब्ध करण्यात आले आहे.
आयआरसीटीसी सुपर अॅप हे ट्रेन प्रवासाशी निगडीत सर्व्हिसला अधिक सुलभ करणाए आहे. Iआयआरसीटीसी सुपर अॅप च्या पूर्वी प्रवासी वापरत असलेल्या अॅप मध्ये प्रवाशांना आयआरसीटीसी वेबसाईट किंवा जुन्या अॅपचा वापर करून तिकीट बुकिंग करावं लागत होतं किंवा पीएनआर स्टेटस चेक करावं लागत होतं. नवीन सुपर ॲप मध्ये सर्व वैशिष्ट्ये एका प्लॅटफॉर्ममध्ये दिली आहेत त्यामुळे हे अॅप लवकर काम करतं. नेव्हिगेशन देखील नव्या अॅपमध्ये अधिक चांगलं आहे. मॉडर्न लूक मुळे युजर्सना ते वापरणं देखील सोप्प आहे. आयआरटीसी चं जुनं अॅप हे तिकीट विक्री वर लक्ष केंद्रीत करणारं होतं पण आता नव्या अॅप मध्ये अनेक सोयी सुविधा आहेत. तिकीट बुकिंगवर सोबतच नव्या, सुपर ॲपमध्ये युजर्सना प्रवासासाठी पॅकेज बुक करण्यास, थेट ट्रेनची स्थिती तपासण्याची आणि जेवण ऑर्डर करण्याची सोय मिळणार आहे.
आयआरसीटीसी सुपर ॲप मध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा थेट बुकिंग उपलब्ध नसते तेव्हा पर्यायी गाड्या किंवा मार्गांची शिफारस करण्यासाठी ते विकल्प सारख्या साधनांचा वापर करू शकतात. युजर्स एकापेक्षा अधिक ट्रेन आणि क्लासेसमध्ये सीटची उपलब्धता देखील तपासू शकतात, ज्यामुळे निश्चित सीट शोधण्याची शक्यता वाढेल.