अमळनेर (प्रतिनिधी) धाबे, ता. पारोळा येथील जि.प. शाळेतर्फे नुकतेच (दि.१०) जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्य साधुन गावात ‘नेत्रदान जागृती प्रभात फेरी’
काढण्यात आली. नेत्रदानाबाबत माहिती, जाणिव व जागृती व्हावी, म्हणुन विदयार्थी, मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे, वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील, सौ. चित्रा पाटील यांनी प्रभात फेरीद्वारे गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विदयार्थ्यांनी ‘नेत्रदान करा’, ‘मरावे परी नेत्ररुपी उरावे’, ‘आपले दान हदय किडनी यकृत गरजवंतासाठी ठरेल अमृत’, ‘मृत शरिराचा करु सदुपयोग अवयव दान देवुन घडवा माणुसकीचे दर्शन’ अशी घोषवाक्य असलेले फलक हातात धरले होते, यावेळी त्यांनी घोषणाही दिल्या. मुख्याध्यापक साळुंखे यांनी उपस्थित ग्रामस्थांना नेत्रदान व अवयव दानाचे महत्व विशद केले. आपण मृत झालो तरी आपल्या दान दिलेल्या नेत्रांनी पुन्हा हे जग पाहु शकतो. एखादया आंधळ्या व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणु शकतो. आपण मृत झाल्यावर आपल्या शरिराची राख किंवा माती होते, त्यापेक्षा जर ते गरजवंतांच्या कामी आले तर या सारखे महान सत्कृत्य नाही. जगता-जगता रक्तदान, जाता-जाता अवयवदान आणि गेल्यावर नेत्रदान हा विचार आचरणात आणु या. मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी सौ. चित्रा पाटील यांनी घरोघरी महिलांना जमवुन याबाबत माहिती दिली व त्यांच्या मनात असलेल्या शंका व गैरसमज दूर केला.
गेल्या वर्षीही अशाचप्रकारे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्या माहितीने प्रभावीत होऊन राहुल साहेबराव निकम सध्या टाईम्स ऑफ इंडिया मुंबई यांच्या आई श्रीमती संध्या निकम पारोळा व एका महिलेने पारोळा शहरातील नेत्रपेढीच्या संचालिका नेत्र तज्ञ डॉ. सौ. राजेश्वरी लुणावत यांच्याकडे जाऊन नेत्रदानाचे अर्ज भरुन दिले. तसेच जळगाव येथील भरत चैत्राम पाटील यांच्या पत्नी सौ. कांचन पाटील यांनीही नेत्रदानाचा फॉर्म भरुन दिला आहे. धाबे गावातील गणेश सुरेश भिल, मगन भुरा भिल यांनीही देहदानाचे संकल्प पत्र भरून दिले आहे. या उपक्रमाला किरण राजपूत व वीर एकलव्य बजरंग ग्रुप धाबे अध्यक्ष रविंद्र भिल, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल यांचे सहकार्य लाभले.