टोकिया वृत्तसंस्था । अंमली पदार्थांचा साठा जवळ बाळगल्या प्रकरणी उद्योगपती नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
वाडिया उद्योग समूहाचे प्रमुख नेस वाडिया यांना या वर्षीच्या मार्च महिन्यात जपानमधील न्यू होईकदो विमानतळावरून अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. नंतर मात्र ते जामीनावर सुटून भारतात आले होते. त्यांच्यावर जपानमधील न्यायालयात खटला भरण्यात आला होता. यात त्यांना दोन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेस वाडिया हे दिग्गज उद्योगपती नसली वाडिया यांचे पुत्र असून ते किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएलमधील संघाचे सहमालक व प्रिती झिंटाचे माजी बॉयफ्रेंड आहेत. त्यांना जपानमध्ये शिक्षा सुनावण्यात आल्याने कार्पोरेट विश्वात खळबळ उडाली आहे. याआधी त्यांच्यावर प्रिती झिंटाने छेडखानीचा आरोप लावला होता. त्यानंतर आता अंमली पदार्थांमुळे शिक्षा सुनावण्यात आली आहे.