साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका सह संघटकपदी येथील नेहल कुरकुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका सह संघटक पदी नेहल कुरकुरेची निवड साकेगाव प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये भुसावळ तालुक्याच्या सह संघटक पदी साकेगावचा तरुण नेहल कुरकुरे याची नुकतीच भुसावळ नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग प्रदेश अध्यक्ष किशोर शिंदे प्रदेश सरचिटणीस तुषार आगरकर, राकेश पेंडेकर, राज्य उपाध्यक्ष मोहन चव्हाण, चेतन आढळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये निवड करण्यात आली.
दरम्यान, याप्रसंगी तसेच जळगाव जिल्हा संघटक पदी राजेंद्र सुकलाल निकम यांची निवड करण्यात आली. तसेच भुसावळ शहर संघटक पदी श्रीकृष्ण मेंगडे, भुसावळ तालुका उपसंघटक स्नेहल कुरकुरे, नुकुल महाजन यांची भुसावळ शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यांच्या निवडीबद्दल गावातून यांच्यावर मोठा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.