यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषद प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या दृर्लक्षित कारभारामुळे तालुक्यासह ग्रामीण परिसरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. या सर्व गोंधळलेल्या कारभारामूळे आरोग्य सेवेची डोके दुःखी वाढली आहे.
दरम्यान अनलॉक असले तरी कोरोना विषाणुच्या महामारीचे संकट हे अद्याप टळलेले नाहीत असे असतांना यावल शहरातील फैजपुर मार्गावर, भुसावळ टी पाँइटवर व अन्य ठीकाणी सुमारे १००हुन अधिक कालबाह्य झालेल्या वाहनातुन अवैद्यरित्या कोरोना संसर्गाचे नियम धाब्यावर ठेवुन आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतुक होत असल्याचे दिसुन येत आहे. तर दुसरी कडे शहरातील विविध सार्वजनिक ठीकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग नियमांना न मानता शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळ्यांचे कार्यक्रम करण्यात येत आहेत. प्रमुख बाजारपेठेतील काही व्यापारी वेळेचे बंधन न पाळता आपले व्यवसाय करीत असल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. याचा अर्थ असा की गेल्या काही दिवसांपासुन नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाचे या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याने हा प्रकार वाढल्याचे बालले जात आहे, या सर्व प्रश्नाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देवुन कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कठोर पाऊल उचलावे. असे नागरिकांकडून आवाहन करण्यात येत आहे.