जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील राहणारा तरुण हा काम आटपून घरी दुचाकीवरून परतत असताना नायलॉनच्या मान्याने महिलांचा माझ्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन तरुण घरी बचावला आहे या घटनेमुळे तरुण थोडक्यात बचावला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील तरुण विकी नारायण तरटे आपले काम आटपून मंगळवारी १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दुचाकीने घरी जात असताना कानळदा रोडवरील १०० फुटी रोडवर अचानक नायलॉन मांजामुळे त्याच्या गडाला गंभीर जखम झाली. प्रसंगावधान दाखवल्याने तरुण थोडक्यात बचावला आहे. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले.