रांची-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | झारखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वात एनडीएकडून ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन, जनता दल(यू) आणि लोकजनशक्ती पार्टी मिळून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या ठिकाणी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.
या निवडणुकीत आजसू १० जागांवर तर जेडीयू २, चिराग पासवान यांच्या एलजेपीला १ आणि उर्वरित ६८ जागांवर भाजप निवडणूक लढविणार आहे. केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत घोषणा केली.
दरम्यान, छोटा नागपूरच्या पठारवरील जंगलांनी वेढलेल्या झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागांसाठी लढत होणार आहे. विधानसभेत सरकार आणण्यासाठी ४२ जागांचे बहुमत आणावे लागेल. मागील २०१९ च्या निवडणुकीत ३० जागा जागा जिंकून झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष बनला होता.