पहूर ता. जामनेर, प्रतिनिधी | येथील राष्ट्रवादी काँग्रेस शाखेतर्फे पश्चिम महाराष्ट्र व कोकण आदी भागात अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी आज (दि.१२) मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजार व परिसरातील सर्व व्यापाऱ्यांकडून मदत गोळा करण्यात आली.
यावेळी माजी जि.प. कृषी सभापती प्रदीप लोढा, उपसरपंच श्याम सावळे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, किरण पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष आरिफ खान, माजी उपसरपंच ईका पैलवान, नाजिम, ग्रामपंचायत सदस्य चांदा तडवी, ईश्वर बारी, प्रकाश पाटील, सलीम शहा, वसीम शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी रोख रक्कमेच्या स्वरूपात मदत दिली. ही सर्व रक्कम राज्यातील पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहे.