Home राजकीय राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; लवकरच शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; लवकरच शिवसेनेत प्रवेश

0
17

download 1 8
 

रायगड (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार सुरेश लाड  हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, लाड हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर यापूर्वी तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

 

सुरेश लाड हे शिवबंधन बांधून, आता शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत आहेत.सुरेश लाड हे सुनील तटकरे यांच्या सर्वात जवळचे सहकारी आहेत. सुनील तटकरे यांचा सख्खा पुतण्या अवधूत तटकरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता सुरेश लाड यांनीही सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने, तटकरेंसाठी आणि पर्यायाने राष्ट्रवादीला हे मोठे धक्के आहेत.


Protected Content

Play sound