
मुंबई (वृत्तसंस्था) वरळी विधानसभा मतदारसंघातूनही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरे यांना आघाडीच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. येत्या २ ऑक्टोबर रोजी आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा येत्या गांधी जयंती दिनी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून आमच्या आघाडीत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टी, आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला घेण्यात येणार आहे. त्यांच्याशी त्याबाबत बोलणेही सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.