यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळातील विधानसभा, नगर परिषद व पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीसाठी रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी हे उपस्थित होते.


यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी यावल तालुक्याचा पक्ष बांधणी बाबतचा आढावा घेतला. आगामी काळात पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदधिकारी यांना दिले. व रावेर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्याना आश्वासन दिले. बैठकीच्या सुरवातीस प्रस्ताविकात तालुकाध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी तालुक्याची सविस्तर माहिती दिली. बुथ सक्षमीकरण करण्याचे आश्वासन वरिष्ठांना दिले.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष यांचे यावल तालुक्याच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आले. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, डी.पी.साळुंखे, ज्योती पावरा, चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील, सईद शेख, अन्वर खान, साखळी ग्रामपंचायतचे सरपंच दीपक पाटील, फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, यावल शहराध्यक्ष करीम मण्यार, अमोल दुसाने, हितेश गजरे, डी.एम.पाटील, नरेंद्र पाटील, ललित पाटील, प्रसन्न पाटील, किरण पाटील, सलीम तडवी, समाधान पाटील, दत्रातराय पाटील, बापू जासूद , शशिकांत पाटील, अरुण लोखंडे, कामराज घारू, मोहसीन खान, सद्दाम खान, निलेश बेलदार, पितांबर महाजन, मंगलाताई नेवे, ममता आमोदकर, भगवान बर्डे, सहदेव पाटील, गजू पाटील, एजाज मण्यार, नईम शेख, विकी गजरे, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, सचिन येवले, शेख अन्वर, शेख अशपाक भाई, ललित पाटील, विजय साळी, मयूर पाटील,पिंटू कुंभार,सुरेश कुंभार, राहुल गजरे उपस्थित होते.

