यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्ष स्थापनेचा २५ वा वर्धापन दिन उत्साहाच्या वातावरणार साजरा करण्यात आला. या प्रसंगी यावल येथील खरेदी-विक्री संघाच्या संकलनात असलेल्या पक्षाच्या संपर्क कर्यालयावर पक्षाचे ध्वजाचे ध्वजरोहण करण्यात आले.

यावेळी पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील व जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांनी नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीचे कौतुक करीत, पवार यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या अथक परिश्रमाचे विशेष कौत्तुक केले. येणाऱ्या काही दिवसात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष हे महाविकास आघाडी सोबत राहुन राज्यातील सत्ता परिवर्तन करेल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अतुल पाटील, विजय पाटील, आदिवासी विभागाचे एम बी तडवी, मोहसीन खान, प्रसन्न पाटील, किरण पाटील, गिरीश पाटील, सहदेव पाटील, अॅड निवृत्त पाटील, ललीत पाटील, हाजी फारूख शेख, कामराज घारू, सईद शेख, बापु जासुद, अन्सार खान, अफरोज पटेल, हाजी युसुफ भाई यांच्यासह असंख्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Protected Content