Home Cities जामनेर इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीकडुन केंद्र सरकारचा निषेध

इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीकडुन केंद्र सरकारचा निषेध

0
51


जामनेर प्रतिनिधी । गँस, डिझेल, पेट्रोल, इंधन दरवाढीबाबत जामनेर राष्ट्रवादीकडुन नगर परिषद समोर जिजाऊ चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, संजय गरूड, विलास राजपुत, सरोजिनी गरूड, राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, अशोक चौधरी, डॉ.प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे, संदिप हिवाळे, दिपक रिछवाल, उज्ज्वला पाटील, सुनंदा चव्हाण, माधव चव्हाण आदी या आंदोलनात सहभागी होते. आंदोलन कर्त्यांनी चौकात पारंपरिक पद्धतीने चुलीवर भाकरी बनवुन मोदी, शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी वंदना चौधरी यांनी आपल्या मनोगतात मोदी शहा सरकारचा निषेध करत महिलांच्या बाबतीत सरकार इतके उदासीन का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गँसचे भाव वाढल्याने स्वयंपाकघरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारला महिलांच्या समस्यांची काहीच जाणीव नसुन या विरोधात आंदोलन उभारण्यासाठी महिला आता सज्ज होणार आहे. त्याचे परिणाम आता या निगरगठ्ठ मोदी सरकारला दिसुन येतील अशा भावना महिलांच्या वतीने चौधरी यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केल्या. यावेळी तहसील कार्यालयालर निषेध मोर्चा काढण्यात येवून निवेदन देण्यात आले.


Protected Content

Play sound