मुंबई-वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार बाबा सिध्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माजी आमदार बाबा सिध्दीकी यांच्यावर काल रात्री सव्वानऊच्या सुमारास निर्मलनगर भागात तीन ते चार राऊंड गोळीबार करण्यात आला होता. यात ते गंभीर जखमी झाले होत्ो. यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
बाबा सिध्दीकी यांचे पुत्र झिशान हे आमदार असून बाबा यांनी अलीकडेच अजित पवार गटात प्रवेश घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी जिवे ठार मारण्याची धमकी आली होती. यानंतर हल्लेखोरांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे.
दरम्यान, बाबा सिध्दीकी यांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडालेली आहे. हल्ला झाला त्ोव्हा त्यांच्या सोबत पुत्र झिशान हे देखील होते. मात्र ऑफिसमधून कुणाशी तरी बोलण्यासाठी मध्ये गेल्याने ते थोडक्यात बचावले. अन्यथा सिध्दीकी पिता-पुत्राचा एकाच वेळी खून करण्याचा कट असल्याचे यातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन मारेकऱ्यांना ताब्यात घेतला असून एक जण फरार झाला आहे. हे मारेकरी अनुक्रमे युपी व हरियाणाचे आहेत. यामुळे बाबा सिध्दीकी यांच्या मर्डरमागे उत्तर भारतातील एळाद्या गुन्हेगारी टोळीचा हात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.