एरंडोल, प्रतिनिधी | येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. सतीष पाटील यांनी आज गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णयाधिकारी विनय गोसावी यांच्याकडे दाखल केला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार, तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, अमित पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सतीष पाटील यांनी पारोळा येथे निवासस्थानी त्यांच्या मातोश्रींचा प्रथम आशीर्वाद घेतला. नंतर एरंडोल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व आघाडीतील मित्र पक्षांचे कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात आपली भुमिका विषद केली. यात त्यांनी ५ वर्ष विरोधी पक्षाचा आमदार असतांना जनतेचा आवाज विधानसभेपर्यंत पोहचविला व विरोधकांचे नाव न घेता ज्यांना शिवसेना कळली नाही तो शिवसैनिक कसा असा टोला मारला. ही लढाई गुर्मी उतरविण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप व शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.एरंडोल येथे महात्मा फुले विद्यालयाच्या क्रीडांगणावर कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. प्रास्तविक यशवंत पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आर. डी. पाटील व ईश्वर बिऱ्हाडे यांनी केले. आभार नगरसेवक बबलु चौधरी यांनी मानले. याप्रसंगी माजी खा.वसंतराव पाटील, अमित पाटील,तिलोत्तमा पाटील, कल्पना पाटील, मनोराज पाटील, रोहन पाटील, पराग पवार, डॉ. के. ए.बोहरी, माजी आमदार दिलीप सोनवणे, डॉ.फरहाज बोहरी, पुष्पलता पाटील, नगरसेविका वर्षा शिंदे, कल्पना चौधरी, नगरसेवक रोहन पवार, राजेंद्र शिंदे, डॉ. राजेंद्र देसले, नगरसेवक अभिजित पाटील, डॉ. अमीन कुरेशी, अड. अहमद सैयद, नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, अशफाक बागवान, दशरथ चौधरी आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते. मेळाव्यानंतर शहरातून ढोल ताशांच्या गजरात फेरी काढण्यात आली. यावेळी रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले.