Home धर्म-समाज रावेरात राष्ट्रवादीतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप (व्हिडिओ)

रावेरात राष्ट्रवादीतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप (व्हिडिओ)


 

 

रावेर, शालीक महाजन । कोरोनाच्या आपत्तीमुळे कडक निर्बंध लादण्यात आल्याने कष्टकर्‍यांना दोन वेळेचा घास मिळणे देखील कठीण झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. माजी आमदार मनीषदादा जैन यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.

 

शहराध्यक्ष महेमुद शेख यांच्या सहकार्याने गरजूंना ५० किट्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार मनीष जैन यांनी  सर्वांनी आपल्या क्षमतेने अन्नधान्याचे वाटप केले तर गरीबांना  त्याचा लाभ मिळेल. मात्र, हे सर्व शांततेत करावे, याची कोठेही प्रसिद्धी करू नये असे आवाहन केले.  त्यांनी सर्वांना मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, घराच्या बाहेर पडू नका, स्वतःची जबाबदारी स्वतःची काळजी स्वतः घ्या  असे आवाहन लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून केले.

 

यासोबत त्यांनी ऑक्सिजन, रेमडीसिव्हरची कमतरता व  बेड उपलब्ध नसल्याने   सरकार आपली जबाबदारी पार पाडत असतांना  तुम्हीही घराबाहेर पडू नका असे आवाहन केले. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मनिष जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉकडाऊन 0.2 मध्ये हातावर पोट असणा-यांच्या घरापर्यंत  किराणा किट्स पोहचवीण्यात आले. किट्स बघुन अनेकांच्या चेह-यावर आनंद बघुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुध्दा भारावुन गेले होते.यावेळी राष्ट्रवादीचे सोपान पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी , शहराध्यक्ष महेमुद शेख , मनोज वाघ , पंकज वाघ आदी उपस्थित होते.

 

FaceBook Video Link :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1651847268321027

 


Protected Content

Play sound