जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खोटे नगरातील कृषी विद्यालयाल कोवीड सेंटरची उभारणी करून खोटे नगर परिसरातील रूग्णांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना आज दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता कोवीड सेंटर, खासगी रूग्णालय कोवीड रूग्णांनी फुल्ल झाले आहे. त्यातच खोटे नगर परिसरातील १६० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून दिवसेंदिवस ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. खोटे नगर परिसरातील कृषी विद्यालयाला कोवीड सेंटर घोषीत केल्यास खोटे नगर परिसरातील रूग्णांना सोयीस्कररित्या होईल असे नमूद केले आहे..
राष्ट्रवादी काँगेसचे महानगर सरचिटणीस सुशील शिंदे, युवक अध्यक्ष भैय्या पाटील, उपाध्यक्ष विशाल देशमुख, सुर्यकांत भामरे, धवल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.