Home राजकीय राष्ट्रवादी रावेर शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी रावेर शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी दिला राजीनामा

0
130

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार)चे शहराध्यक्ष म्हणून महेमुद शेख यांची रावेरमध्ये मजबूत पकड असून त्यांचा मोठा जनाधार आहे. अनेक वर्षांपासून पक्ष संघटनात सक्रिय भूमिका बजावत त्यांनी विविध स्तरांवर पक्षाला बळकटी दिली होती. त्यामुळे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनी कोणतीही कारणे न देता अचानक दिल्याने पक्ष कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

रावेर शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे अनेक नागरिक आहेत. अशा वेळी त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाच्या शक्तीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचे स्थानिक पातळीवर मानले जात आहे.

 


Protected Content

Play sound