छत्तीसगड वृत्तसंस्था । छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात ‘डीआरजी’ (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स) कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा झाला आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झालेल्या ठिकाणावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कडती मुत्ता असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. या अगोदर छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्य़ात गुरुवारी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता. तर, दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते.