नवी मुंबई विमानतळ २०२५ पासून सुरू होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च 2025 पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री नायडू आणि मोहोळ यांनी विमानतळाची पाहणी केली आहे. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई, पुणे, ठाणे, कल्ल्याण आणि पश्चिम महाराष्ट्र सोबत असलेली कनेक्टिव्हीटी सुधारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विमानतळाचे नाव कैलासवासी दि. बा. पाटील यांच्या नावे ठेवण्याला त्यांनी सहमती असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी मॅनेजमेंट सोबत चर्चा देखील करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी जागा विमानतळासाठी दिली त्यांना वार्‍यावर सोडलं जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी खाडीत जलसमाधी आंदोलन केले होते. विमानतळासाठी गावे उठवली, शेतकरी, ग्रामस्थांच्या जमिनी ताब्यात घेतल्या पण दिलेली आश्वासने सिडकोने पूर्ण केली नाहीत, असा गंभीर आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

 

Protected Content