
अमळनेर (ईश्वर महाजन) तालुक्यातील शहापुर या गावाने पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थ दररोज श्रमदान करीत आहेत. एका नवविवाहित दाम्पत्याने विवाहबद्ध होताच शेत शिवारात जात श्रमदान केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे यानिमित्ताने सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील गावात गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहे. दिवस रात्र जसा वेळ मिळेल तसा आप आपली जबाबदारी समजून घेत प्रत्येक घरातले (परिवारातले) सदस्य वेळ देऊन श्रमदान करीत आहेत. दी. 8 रोजी गावात प्रभाकर महाले यांचे चिरंजीव चतुर व शिंदखेड़ा तालुक्यातील खलाने येथील धनराज देसले यांची कन्या ऐश्वर्या यांचा विवाह होता. नेहमीप्रमाने गावात सकाळी गावातील ग्रामस्थ, महिला शेतशिवारात श्रमदान करीत असल्याने नववधू व नवरदेवाने ही श्रमदान करून विवाहित जीवनाला सुरुवात केली. त्यामुळे यावेळी या लग्नाला (विवाहाला )आलेले बाहेर गावातील पाहुणे मंडळी यांनीही गावातील ग्रामस्थाची एकजुट पाहुन आश्चर्य व्यक्त केले. गाव पाणीदार करण्यासाठी ‘गावात तूफान आलया’चे चित्र दिसत आहे. पाणी फाउंडेशनमध्ये नक्कीच एकदिलाने काम करीत गाव पाणीदार करण्यासाठी शहापुर ग्रामस्थ यांचा एकोपा या श्रमदान मधून दिसून येत आहे. यावेळी डॉ. डीगंबर माळी ,भूषण पाटील, सागर सोनवणे,विकास पाटील, प्रदीप पाटील,पृथ्वीराज माळी,देवानंद पाटील महिला आदी यावेळी उपस्थित होते.