चाळीसगाव (प्रतिनिधी) युवानेते मंगेश चव्हाण यांनी आपल्या वाढदिवशी चाळीसगाव तालुक्यामध्ये 5 मिनी सायन्स लॅब देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता त्यांनी लगेच केली. त्यानुसार आज वाडीलाल भाऊ राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरखेड तांडा याठिकाणी मिनी सायन्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे.
या मिनी सायन्स लॅब च्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना युवा नेते मंगेश चव्हाण म्हणाले की, “विज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रगतीकडे जाता येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, या उद्देशाने मिनी सायन्स लॅब देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी याचा अधिकाधिक वापर करावा. मागच्या वर्षी वाढदिवसाला पाच मिनी सायन्स लॅब दिल्या होत्या. यावर्षीही पाच मिनी सायन्स लॅब देण्याचा संकल्प केला आहे”, असे मत मांडले.