यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
यावल येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या व्यापारी संकुलनातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात ६ डिसेंबर हा दिवस देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८वा परिनिर्वाण दिन पुण्यतिथीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हा प्रवक्ता अतुल पाटील, आदिवासी तडवी भिल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम.बी. तडवी यांच्यासह पक्षातील नाना बोदडे, नरेंद्र शिंदे, हितेष गजरे, अरूण लोखंडे, राहूल गजरे, कामराज घारू, गोलु महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांनी कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करीत भावपुर्ण आदरांजली अभिवादन करण्यात आले .