राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभा निवडणूकी नंतर आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, अल्पसंख्यांकचे नेते एजाज मलीक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत पाहिजे तसा निकाल लागलेला नाही, त्यामुळे जनतेकडून देखील नाराजी पहायला मिळत आहे. परंतू आता कार्यकर्त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे असे आवाहन भास्करराव काळे यांनी केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूकीत जनतेला परिवर्तनाची अपेक्षा होती, त्यानुसार महाविकास आघाडीच्य घटक पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी जोमाने कामाला सुरूवातही केली होती. निवडणूकीच्या प्रचारात जनतेचा कल देखील महाविकास आघाडीकडे असतांना मात्र निकाल हा विरूध्द बाजूने लागला आहे. हा सगळा घोळ ईव्हीएम मशीनीने केलेला असल्याचे संशय अनेकांना बळावला आहे. हा निकाल जनतेच्या अपेक्षेप्रमाणे नसल्याने महाविकास आघाडी घटकपक्ष नेतेच नाही तर जनताही संभ्रमात पडलेली आहे. दुसरीकडे विकासाच्या नावाखाली विरोधकांनी निवडणूकी लढविली. आता निकाल लागून आठवडा झाला परंतू त्यांचा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हे ठरले जात नाही असा टोला त्यांनी दिला.

Protected Content