Home राजकीय सिन्हा यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या मेमन यांनाही जिना प्रेमाचे भरते

सिन्हा यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या मेमन यांनाही जिना प्रेमाचे भरते


majid 1554109763 618x347

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा मोहम्मद अली जिनांबद्दल केलेल्या स्तुतीपर विधानाने वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनाही जिना यांच्या प्रेमाचे भरते आले आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत जिनांचं मोठं योगदान होते मात्र जिना मुस्लिम होते, म्हणूनच आज शत्रुघ्न सिन्हा यांच्या विधानावरून वाद निर्माण केला जात आहे. सिन्हा यांना देशद्रोही म्हटलं जात आहे, असा तर्क माजिद मेमन यांनी मांडला आहे.

 

शत्रुघ्न सिन्हा यांची पाठराखण करताना मेमन यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की, कालपर्यंत शत्रुघ्न सिन्हा त्यांच्याच पक्षात होते. त्यांनी देशविरोधी विधान केले, असे आपण म्हणत असाल तर मग ही तुमचीच शिकवण ठरत नाही का ?, अशी मखलाशी करण्याचा प्रयत्नही मेमन यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound