जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती नगरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आगामी होणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या उपस्थितीत आज सोमवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कार्यकर्ता बैठक घेण्यात आली.
जिल्ह्यातील आगामी काळात होणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांसह इतर सर्वच निवडणुक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे. निवडणूकांसाठी आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे, असा सल्ला आज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षाच्या आढावा बैठकीत दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी आमदार सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या उपाध्यक्षा कल्पना पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ओबीस सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, जळगाव राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, माजी आमदार मनिष जैन, विकास पवार, राजेश पाटील, लता मोरे, जयश्री पाटील, ममता तडवी, कमला पाटील, अर्चना कदम, तुषार इंगळे, उज्जवला शिंदे, शकुंतला धर्माधिकारी, दिव्या भोसले, जुलिया शाह, स्वप्निल नेमाडे, ॲड. कुणाल पवार, रमेश भोळे, सतिष सुर्वे, मजहर पठाण, डॉ. रिजवान खाटीक, फीरोज शेख, हुसेन बाबा, राहूल पाटील, जयेश शिरसाळे, चंद्रमणी सोनवणे, सौरभ पाटील, नाना कोळी, कुणाल चौधरी, युनूस खान, छोटू मिस्तरी, राकेश माळी, मुकेश सपकाळे, रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.