Home Cities भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध नोंदण्यासाठी उपस्थितीचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध नोंदण्यासाठी उपस्थितीचे आवाहन

0
31


 

भुसावळ, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा निषेध नोंदण्यासाठी गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता भुसावळ प्रांत यांना निवेदन देण्यात येणार आहे.

शरद पवार यांच्यावर ईडीमार्फत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी भुसावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी सकाळी १०.०० वाजता अष्टभुजा देवी मंदिर, जामनेर रोड, भुसावळ येथे उपस्थित राहावे असे आवाहन न.पा. वरणगाव गटनेते राजेंद्र चौधरी , रा. कॉ. पार्टी तालुकाध्यक्ष दीपक मराठे , रा. कॉ. पार्टी, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound