जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल हा अजित पवार यांच्या बाजूने लागल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जामनेर तालुक्यामध्ये फटाके व ढोल ताशे वाजवत जोरदार जल्लोष करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अरविंद चितोडिया यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगरपालिका चौकामध्ये फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात जामनेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र जंजाळ, तालुका कार्याध्यक्ष किरण पाटील, शहर अध्यक्ष प्रभू झाल्टे, किरण पाटील सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष अरविंद तायडे, विकास पाटील, शेंदुर्णी शहराध्यक्ष विलास पाटील, तालुका उपाध्यक्ष पंडित नाईक, आदित्य गायकवाड, मधुकर शिंदे, ओबीसी शहर अध्यक्ष दत्तात्रेय नेरकर, पराग नेरकर, उदय गायकवाड, कुंभारी सरपंच हिरामण जोशी, श्रीराम मुके, सागर देशमुख, गजानन कोली, भरत चव्हाण उपस्थित होते.
पक्ष व चिन्ह मिळाल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जोरदार जल्लोष
11 months ago
No Comments