मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही केली. त्यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
शरद पवार यांच्यावरच्या कारवाईला विरोध म्हणून आज बारामती बंदची हाक देण्यात आली होती. या बारामती बंदला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मी कुठल्याही बँकेचा संचालक नव्हतो, माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याबद्दल मला माहिती नाही, तसंच राष्ट्रवादीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तो पाहूनच असे घडेल अशी शंका मला होतीच, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी मंगळवारी दिली होती. दरम्यान, आज राज्यभर राष्ट्रवादीचे आंदोलनं सुरु आहेत.