फैजपूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस निमीत्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धासंपन्न झाली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत परिसरातील १० शाळा आणि महाविद्यालयांतून ६५२ मुलांनी व १८८ मुलींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे अंतर पुरूषांसाठी ५ किमी. व महिलांसाठी ३ किमी असे होते.

पुरुष गटातून विजयी स्पर्धक –

सागर हरी सपकाळे – प्रथम

प्रवीण किरण मोरे – द्वितीय

तेजस कोळी – तृतीय,

महिला गटातून विजयी स्पर्धक –

आरती संतोष भालेराव – प्रथम (डी एस डी हायस्कूल थोरगव्हाण)

तेजस्विनी विलास कोळी – द्वितीय (डी.एन.कॉलेज, फैजपूर)

पुनम संजय रोझोदकर – तृतीय क्रमांक (घ.का.विद्यालय, आमोदा)

स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या दिवशी लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, फैजपूर,इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी महाविद्यालय फैजपूर आणि आय.जी.एम. कॉम्प्यूटर्स आणि गारमेंट फैजपूर यांच्या सौजन्याने मोफत टि-शर्ट देण्यात आले.

स्पर्धा आज सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता सुरू झाली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले; तर फैजपूर उपविभागीय पोलिस कार्यालयाचे उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी व संस्थेचे उपाध्यक्ष एस.के.चौधरी यांनी हिरवी ध्वजा फडकवत स्पर्धेची सुरुवात केली.

प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सचिव एम. टी.फिरके, सह सचिव के.आर.चौधरी, ओंकार सराफ, रामा पाचपांडे, नितीन चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी तसेच लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कॉलेज, फैजपूरचे प्राचार्य प्रा.आर.एल.चौधरी, आय.जी.एम. कॉम्प्यूटर्स आणि गारमेंट, फैजपूरचे अविनाश जोशी, डॉ.उमेश चौधरी, डॉ.सुनील पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा मार्ग धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील प्रेरणास्तंभ ते सुभाष चौक, खुशालभाऊ रोड, महाजन मेडिकल कॉर्नर, राम मंदिर, तुप गल्ली, लकडपेठ, कालिका माता मंदिर, कुरेशी मोहल्ला, सुभाष चौक आणि शेवट महाविद्यालयाचे प्रेरणास्तंभ असा होता.

स्पर्धेत आरोग्यविषयक सेवा देण्यासाठी डॉ.उमेश चौधरी, डॉ.सुनील पाटील, स्पर्धकांसाठी पिण्याचे पाणी आणि इतर व्यवस्थासाठी सुनील वाढे, अनिरुद्ध सरोदे, संदीप भारंबे, योगेश सोनवणे, नंदकुमार अग्रवाल यांनी सहकार्य केले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गोविंद मारतळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ..जी.जी.कोल्हे, उप प्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे, डॉ.उदय जगताप, प्रा.डी.बी.तायडे, प्रा.ए.जी.सरोदे, एन.एस.एस.चे विद्यार्थी, एन.सी.सी.चे कॅडेट्स व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण संचालक डॉ.जी.एस. मर्तळे यांनी केले.

Protected Content