जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून येथे इयत्ता 8 वीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा दि. 1 जून 2025 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी मुलगे व मुली दोघेही पात्र आहेत.
पात्रता:
उमेदवार दि. 1 जानेवारी 2026 रोजी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 11 वर्षे 6 महिने ते 13 वर्षे यामध्ये असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2013 च्या आधी व 1 जुलै 2014 नंतरचा नसावा.
अर्ज प्रक्रिया:
अर्जासाठी माहितीपत्रक, फॉर्म आणि जुन्या प्रश्नपत्रिका राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या पत्त्यावरून मागवता येतील.
ऑनलाईन पद्धतीने फॉर्म मागवण्यासाठी www.rimc.gov.in संकेतस्थळावर सर्वसामान्य व इतर संवर्गासाठी ₹600/- आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी ₹555/- शुल्क भरून अर्ज मिळवता येईल.
डिमांड ड्राफ्टद्वारे अर्ज मागवण्यासाठी ₹600/- (सर्वसामान्य) किंवा ₹555/- (SC/ST) चा ड्राफ्ट “कमांडंट RIMC फंड” या नावाने काढावा आणि “HDFC बँक, बल्लूपूर चौक, डेहराडून (बँक कोड 1399)” येथे पाठवावा.
आवश्यक कागदपत्रे:
जन्म दाखल्याची प्रत, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला (SC/ST उमेदवारांसाठी), शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत, दोन पासपोर्ट साइज फोटो, वरील सर्व कागदपत्रे साक्षांकित (Attested) करणे आवश्यक आहे.
अर्ज सादरीकरण:
पूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रे जोडून, मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, पत्ता: शिवाजीनगर, पुणे 411004 या पत्त्यावर 31 मार्च 2025 पर्यंत स्पीड पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जमा करावीत.
परीक्षेचे स्वरूप:
विषय: इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान
दिनांक: 1 जून 2025
लेखी परीक्षेत यशस्वी उमेदवारांना मौखिक परीक्षेची तारीख स्वतंत्ररीत्या कळवण्यात येईल.
अधिक माहिती:
फोन नंबर: 020-29709617
ईमेल: [email protected]
वेबसाईट: www.mscepune.in
विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून परीक्षेसाठी तयारी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.