गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे नाविन्यपूर्ण नर्सिंग शिक्षणातील सुधारणा आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये उत्कृष्टता या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे गुरूवारी मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. दरम्यान दोन दिवसीय परिषदेसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील ५५० प्रतिनीधींची उपस्थिती लाभली आहे.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे ब्रिजिंग द गॅप: नाविन्यपूर्ण नर्सिंग शिक्षणातील सुधारणा आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये उत्कृष्टता या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. आय. क्लेमेंट (बंगळुरू), डॉ. लॅरिसा मातरा (बंगळुरू), डॉ. जमुना राणी(पश्चिम बंगाल), डॉ. रीटा लखानी (मुंबई), डॉ. रवींद्र एच. एन.(गुजराथ), डॉ. नेसा सत्या (मंगळुरू), डॉ. मोहम्मद हुसेन (नाशिक, महाराष्ट्र), वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्राचार्या विशाखा गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्राचार्या विशाखा गणवीर यांनी परिषदेच्या थीमबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता यांनी परिषदेचा उद्देशााबाबत नर्सिंग शिक्षण आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन दृष्टिकोन आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे असे सांगितले. सत्रांमध्ये नर्सिंग शिक्षणातील नवीन पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि सैद्धांतिक व प्रायोगिक प्रशिक्षणामधील अंतर कमी करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

परिषदेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच उद्या दि. ११ रोजी महत्त्वपूर्ण पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात नर्सिंग शिक्षणाच्या आव्हानांवर आणि भारतातील भविष्यातील दिशांवर चर्चा होईल. या पॅनेलमध्ये डॉ. अन्सी रमेश, डॉ. मिलिंद काळे, डॉ. विश्वनाथ बिरादार, डॉ. शिवचरन सिंग या मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. ही पॅनेल चर्चा प्रा. स्वप्नील रहाणे यांच्या संयोजनाखाली होणार असून, ही चर्चा अत्यंत प्रेरणादायक आणि ज्ञानवर्धक होण्याची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. जसिंथ दया, प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. पियुष वाघ यांची उपस्थिती होती. या परिषदेच्या आयोजनासाठी प्राचार्य विशाखा गणवीर आणि महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रवीण कोल्हे यांनी विशेष सहकार्य केले आहे. आयोजकांनी नर्सिंग शिक्षणात नाविन्यपूर्ण बदल घडवण्याचे ध्येय ठेऊन हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. परिषदेचे सुत्रसंचालन प्रा. निम्मी वर्गीस यांनी तर आभार प्रा. जसिंथ दया यांनी मानले. यशस्वीतेेसाठी समन्वयक जयश्री जाधव, गिरीश खडसे, सचिन पवार, स्वाती गाडेगोने, समृध्दी अवसारे, स्मीता पांडे, तांत्रिक टीम निर्भय मोहोड, रश्मी टेंभूर्णे, प्रशिक चव्हाण, साउंड कमिटी अभिजीत राठोड, भुषण चौधरी, आबिद पठाण, फुड कमिटी प्रियंका गवई, प्रिती गायकवाड, अस्मिता जुमडे, सुमित निर्मल हे परिश्रम घेत आहेत.

Protected Content