यशोदाबाई दगडू सराफ कॉलेज ऑफ फार्मसी या शैक्षणीक संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपुर येथील नशा मुक्ती भारत अभियान सेमिनार कैलासवासी यशोदाबाई दगडू सराफ यांच्या शैक्षणिक संस्थेस कन्व्हेन्शन सेंटर न्यू दिल्ली येथे राष्ट्रीय नशा मुक्ती दिनाचे औचित्त साधुन संस्थेच्या वतीने संस्थेच्या वतीने नशा मुक्ती संदर्भात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेत सन २०२४ पुरस्कार या वर्षाच्या राष्ट्रीय युरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कैलासवासी यशोदाबाई दगडू सराफ कॉलेज ऑफ फार्मसी या ट्रस्टला पुरस्कार देण्यात आला.

कैलासवासी यशोदाबाई दगडू सराफ ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांनाही यावेळी भारत मुक्ती सेमिनार एन डी एम सी कन्वेंशन सेंटर न्यू दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेला २०२४च्या पुरस्कार सोहळयात डॉ संदीप मानिक थांबर व जुही सबरवाल यासह आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कैलासवासी यशोदाबाई दगडू सराफ या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शैक्षणीक व सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक पांडुरंग दगडू सराफ यांच्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेत दिल्लीच्या संस्थेच्या वतीने मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

Protected Content