जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील हैदर अली मोहल्ला येथे एका लग्न समारंभामध्ये अवैधरित्या गौवंश मांसाची कत्तल करताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिवारी २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी कारवाई करत ५ हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पहाटे ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावातील हैदर अली मोहल्ला येथे लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात अवैधरित्या गोवंश मासांची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ५ हजार रुपये किमतीचे १०० किलो वजनाचे गोवंशाचे मांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणां विरोधात पहाटे ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युनूस रसूल शेख करीत आहे.