नाशिकच्या मामा-भाच्याची दुचाकीवरून महाकुंभांची वारी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिकच्या एका भाविकाने आपल्या भाच्यासोबत दुचाकीवरून तब्बल 2672 किमीचा प्रवास करत महाकुंभ प्रयागराज येथे स्नानाचा अद्वितीय अनुभव घेतला. हा प्रवास केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर श्रद्धा, चिकाटी आणि साहसाचा मिलाफ ठरला.

मागील महिन्यात कुटुंबासह महाकुंभात स्नान केल्यानंतरही मनात एक खंत राहिली. पुढील 144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभात आपण किंवा आपली पुढची पिढी असेल का? याच विचाराने त्यांनी पुन्हा प्रयागराज गाठण्याचा निर्णय घेतला. गर्दीमुळे मोठ्या गाडीत जाणे कठीण असल्याने मोटरसायकलवर हा कठीण प्रवास करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

रोमांचक प्रवासाचा प्रवास

पहिला दिवस: 16 तारखेला सकाळी 8 वाजता नाशिकहून निघून 14 तास सलग प्रवास करत भोपाल येथे रात्री 10 वाजता मुक्काम.
दुसरा दिवस: भोपालहून पुढे निघून मध्यप्रदेशातील रीवा येथे थांबा.
तिसरा दिवस: प्रयागराज गाठून संगमेश्वर येथे पुण्यस्नान.

प्रवासादरम्यान रस्त्यांची स्थिती, वाहतूक, राहण्याच्या आणि जेवणाच्या सोयींचे अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत राहिले. महाकुंभातील स्नानानंतर परतीच्या प्रवासाला लागले असता त्यांनी रात्रीच्या अपघातांचे भीषण दृश्य पाहिले आणि रात्री प्रवास टाळण्याचा महत्त्वाचा धडा मिळवला. महाकुंभातील पुण्यस्नानासाठी दुचाकीवरून तब्बल 2672 किमीचे अंतर पार करत 6 दिवसांमध्ये नाशिकला सुखरूप परतलेला हा प्रवास भाविकांसाठी प्रेरणादायी ठरतो!

Protected Content