बोदवड रेल्वे स्थानकावर नाशिक-बडनेरा मेमूला थांबा ! : आ. चंद्रकांत पाटलांचे प्रयत्न

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रेल्वे स्थानकावर नाशिक ते बडनेरा मेमू ट्रेनला थांबा मिळाला असून यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले प्रयत्न व पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे.

बोदवड रेल्वे स्थानकावर दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी कोरोना काळात बंद पडलेल्या गाड्या पुर्ववत करण्यासाठी तसेच नविन विविध गाड्यांना थांबा मिळण्यासाठी राष्ट्रीय विकलांग पार्टी , भिम आर्मी भारत एकता मिशन , व्यापारी संघटना , कृषी संघटना , प्रवासी संघटना तसेच पत्रकार संघटना यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या उपस्थितीत “रेल रोको आंदोलन“ पार पडले होते. यापुर्वी ; 9 ऑगस्ट 2023 रोजी रेल रोको आंदोलन पार पडले होते. त््याावेळेस, रेल्वे प्रशासनाने आश्वासन देउनही शब्दपुर्ती न करता केवळ अमरावती पुणे एक्स्प्रेस या एका रेल्वे गाडीला थांबा दिला होता. कोरोना मध्ये बंद केलेल्या गाड्या पुर्ववत न केल्याने राष्ट्रीय विकलांग पार्टी , भिम आर्मी भारत एकता मिशन , व्यापारी संघटना , कृषी संघटना , प्रवासी संघटना तसेच पत्रकार संघटना यांच्या वतीने दिनांक 30 सप्टेंबर रोजी बोदवड रेल्वे स्थानकावर “रेल रोको आंदोलन“ पार पडले.

यावेळी , आमदार चंद्रकांत पाटिल यांनी दुसऱ्यांदा दाखल होत त्यांनी आक्रमक भुमिका मांडली. याची दखल घेऊन डीआरएम यांच्या अधिकारक्षेत्राखालील असलेल्या “नाशिक बडनेरा मेमो“ या रेल्वे गाडीला तात्काळ थांबा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. दिलेला शब्द रेल्वे प्रशासनाकडून पाडण्यात आला असून “नाशिक-बडनेरा मेमू“ला थांबा मंजूर झाला आहे.

बोदवड रेल्वे स्थानकावर दिनांक ४ रोजी नाशिक बडनेरा जाणारी गाडी रात्री साधारणत: 1:07 तर बडनेरा ते नाशिक जाणारी रेल्वे गाडी दुपारी साधारणत: 1:41 वाजता थांबेल. उर्वरित गाड्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने याबाबतचे प्रस्ताव वरीष्ठ यंत्रानेकडे पाठविले आहे. याबाबत आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल हे प्रयतशील असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेयांच्याकडे ते सातत्याने विषय लावून धरत आहे. रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचे चौफेर प्रयत सुरु आहेत. रेल्वे प्रशासनाने शब्द न पाळल्यास ते गनिमी कावा पद्धतीने रेल्वे रुळावर “रेल रोको आंदोलन“ करणार असल्याचा इशारा त्यांनी यापुर्वी दिलेला आहे. बोदवड रेल्वे स्थानकावर कोरोना काळात बंद पडलेल्या गाड्या पुर्ववत करण्यासाठी तसेच इतर नविन गाड्या सुरु करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटिल यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु आहे.

Protected Content