नर्मदा परीक्रमावासी डॉ .नि. तु. पाटील यांचा जाहीर सत्कार

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सलग १०८ दिवसांत ३६०९ किमी अंतर पायी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या डॉ. नि. तु. पाटील यांचा तळवेल येथे भव्य सत्कार करण्यात आला. श्री म्हाळसादेवी मंदिर संस्थान तळवेलच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना सपत्नीक गौरविण्यात आले.

“गावकऱ्यांकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी महाकुंभात त्रिवेणी संगम स्नान करण्यासारखा आहे,” असे डॉ. पाटील यांनी सांगितले. या सोहळ्यात ह.भ.प. मनोज बुवा व भजनी मंडळ, भुसावळ शेतकी अध्यक्ष ज्ञानदेव झोपे, संस्थान अध्यक्ष प्रो. डॉ. निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, सुधीर पाटील, विनोद पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील यांचे वडील तुकाराम पाटील आणि आई वैशाली पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. पाटील यांनी परिक्रमेतील अनुभव कथन करताना सांगितले, परिक्रमा सुरु झाल्यावर तिसऱ्या दिवसी एका आश्रमात निवास करत असतांना एका महाराज यांनी मला एक प्रश्न विचारला.ते म्हणाले,” डॉ.साहेब मुझे खाना खाने के बाद भूक नही लगती और जब मै सोता हुं,तब मेरी आँखं खुली नही रहती ? तेव्हा मी लगेच म्हणालो,” महाराज मै आपको गोलिया लिख देता हुं,आपको बस एक गोली निंद लगने के बाद और दुसरी गोली निंद खुलने सें पहले लेनी हैं” यावर त्याठिकाणी एकच हशा पिकला.असे विविध अनुभव यावेळी कथन करण्यात आले.शेवटी डॉ.पाटील यांनी सर्व मंडळींना माता नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आवाहन केले सोबत त्यासाठी काही मार्गदर्शन हवे असल्यास मी सदैव आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन केले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी गावकऱ्यांना नर्मदा परिक्रमा करण्याचे आवाहन करताना, डॉ. पाटील म्हणाले, “जो कोणी परिक्रमा करू इच्छित असेल, त्याला मार्गदर्शनासाठी मी सदैव तयार आहे.”

कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वासुदेव परिवारातील तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. रेणुका पाटील, चि. वेदांत, दुर्वांग, कपिल राणे, दीपक फेगडे, मझर शेख, योगेश मगरे आदींनीही सहभाग घेतला.

Protected Content