नवी दिल्ली वृत्तसंस्था । नव्या भारतात भ्रष्टाचाराला स्थान नसल्याचे सांगत देशातील प्रत्येक नागरिकाचा आवाज ही नव्या भारताची ओळख असल्याचे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते मनोरमा न्यूजच्या कॉनक्लेव्हमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बोलत होते.
मनोरमा न्यूजच्या कॉनक्लेव्हमधील भाषणातून पंतप्रधानांनी अनेक विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले की,
हा नवा भारत आहे, येथे तरुणांच्या आडनावाला महत्त्व नाही. तर आपलं नाव सिद्ध करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे. ते पुढे म्हणाले की, हा नवा भारत आहे जिथे तरुणांचं आडनाव काय आहे यामुळे फरक पडत नाही. तर आपलं नाव सिद्द करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे. काही मोजक्या लोकांचा नाही तर प्रत्येक नागरिकाचा आवाज ही नव्या भारताची ओळख असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.