पारोळा, प्रतिनिधी | पोटच्या मुलीचा बांभोरी येथे गिरणा नदीच्या पुलाजवळ खून करून येथे येवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या नराधम बापाच्या येथील पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेने वेळीच मुसक्या आवळल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, आज (दि.९) सकाळी ९.३० च्या सुमारास पारोळा पो.स्टे.ला जळगाव तालुका पोलीस स्टेशनकडुन फोनद्वारे कळवण्यात आले की, संदीप यादव चौधरी (वय-३०) याने त्याच्या मुलीस बांभोरीजवळ गिरणा नदीच्या पुलानजिक जीवे ठार मारून टाकले आहे व स्वतः पारोळा शहरात ITI मागे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मित्राला कळवले आहे.
त्यानुसार पो.काँ. पंकज राठोड व पो.काँ. सुनील साळुंखे यांनी सदर परीसरात संदीप चौधरी याचा त्याचे नातेवाईक दिनेश चौधरी यांच्या मदतीने शोध घेतला असता सदर आरोपी हा ITI मागे मोकळ्या मैदानात दिसुन आला. त्याला ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन या प्रकरणाबाबत विचारपूस केली असता त्याने घरगुती नवरा-बायकोच्या नेहमीच्या वादाला कंटाळून संतापातुन स्वतःची मुलगी कोमल हीस दि.८ जानेवारीला खोटेनगर येथील राहत्या घरातून रिक्षाने बांभोरी येथे आणले तेथुन गिरणा नदी जवळील नर्सरीजवळ आणुन तिचा गळा आवळून तिला जिवे ठार मारले. त्यानंतर यातील आरोपी संजय हा खाजगी वाहनाने धुळे बसस्टॉप येथे मुक्कामी थांबला सकाळी ४.३० वाजता धुळे ते पारोळा बसने आला व त्याचे एका मित्रास मेसेजकरुन कळवले की, मी माझ्या मुलीला बांभोरी गिरणा पुलाजवळ मारुन टाकले आहे व मी पारोळा शहरात ITI मागे आत्महत्या करणार आहे.
या वरून आरोपी संदीप यास पोलिसांनी ताब्यात घेवून कुटीर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यास पोलीस स्टेशनला आणले व जळगाव तालुका पोलीस स्टेशनला याबाबत कळवले आहे. त्याप्रमाणे जळगाव तालुका पोलीस सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पो.हे.का. धांडे यांचे ताब्यात पुढील योग्य त्या कार्यवाही करता दिले आहे.