नवी दिल्ली वृत्तसंस्था । ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नमो टिव्ही या वाहिनीस प्रारंभ करण्यात आला असून याला विविध डिटीएच मंचावरून उपलब्ध करण्यात आले आहे.
नमो टिव्ही हा नावातच नमूद असल्यानुसार नरेंद्र मोदी यांच्या विचारांना समर्पित असणारी वाहिनी असेल हे आधीच स्पष्ट झाले होते. गत अनेक महिन्यांपासून या चॅनलची टेस्टींग सुरू होती. अखेर ही वाहिनी ३१ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. ही वाहिनी एयरटेलवर ११०; डिश टिव्हीवर १११; टाटा स्कायवर ५१२ तर डिटूएचवर १०२ क्रमांकावर पाहता येणार आहे. तर सिटी केबलवर ३१३ क्रमांकाच्या चॅनलवर याला सादर करण्यात आले असून विविध केबल नेटवर्कवरही याला लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. नमो टिव्हीच्या लाँचींगबाबत भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एका ट्विटच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे.
Capture the colours of elections…
Watch the dance of democracy…
Say NaMo again with NaMo TV.
Tune in to get real time coverage of PM Modi's election campaign and a lot more fascinating content. pic.twitter.com/FrJVnLD43m
— BJP (@BJP4India) March 31, 2019