मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सूचित केल्यानुसार मंत्रालयाच्या समोर असणार्या मंत्र्यांच्या बंगल्यांना आता राज्यातील महत्वाच्या गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.
राज्यीतल सर्वच दुकानात मराठी भाषेत फलक लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांची नावसुद्धा बदलली जात आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या संदर्भात निर्देश जारी केले आहेत. यानुसार राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांची नावं देण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असं नामांतर करण्यात आलं आहे. यात मंत्री उदय सामंत यांचा बंगला आता रत्नसिंधू या नावावे ओळखला जाणार असून मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड या नावाने संबोधले जाणार आहे.
नविन नाव अशी असतील –
अ-३ शिवगड
अ-४ राजगड
अ-५ प्रतापगड
अ-६ रायगड
अ-९ लोहगड
ब-१ सिंहगड
ब-२ रत्नसिंधू
ब-३ जंजिरा
ब-४ पावनगड
ब-५ विजयदूर्ग
ब-६ सिध्दगड
ब-७ पन्हाळगड
क-१ सुवर्णगड
क-२ ब्रम्हागिरी
क-३ पुरंदर
क-४ शिवालय
क-५ अजिंक्यतारा
क-६ प्रचितगड
क-७ जयगड
क-८ विशाळगड